www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांचे आर्शीवाद घेतले. निमित्त होतं मनसे चित्रपट सेनेच्या वर्धापनदिनाचे. राज आणि अमिताभ एकाच व्यासपीठावर येणार याचीच चर्चा होती. यावेळी काय दोघे बोलतात याची उत्सुकता होती. मात्र, राज यांनी झालं गेलं गंगेला मिळालं, असं सांगून अभिताभ राग मनातून काढून टाकला.
मराठीचा अजेंठा हाती घेतल्यानंतर बिग बी यांच्या पत्नी खासदार जया बच्चन यांनी मराठीद्वेषी वक्तव्य केले होते. मी मराठी नाही तर हिंदीच बोलणार असं म्हटलं होतं. त्यावरून मनसे आणि बच्चन असा वाद पेटला. राज यांनी आपल्या भाषेत समाचार घेतला होता. महाराष्ट्रात राहायचे असेल तर दुसऱ्या राज्याचे गुणगान गाऊ नका, असे बजावले होते. त्यामुळे बच्चन कुटुंबीय आणि मनसे दरी वाढली होती. मात्र, झालं गेलं गंगेला मिळालं, असं सांगून राज यांनी पडदा टाकला.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांचे मनसेतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. मनसे चित्रपट सेनेच्या वर्धापनदिननिमित्त आज राज व अमिताभ एकाच व्यासपीठावर येणाचा योग आला. या भेटीत ते दोघे आपल्या जुन्या वादावर काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, तसे न होता वादावर पडदा टाकण्यात आला.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीत केली. मला येथे बोलावून मान दिल्याबद्दल राज साहेब यांना धन्यवाद देतो, असे अमिताभ म्हणाले. मनसे चित्रपट सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय सिनेमाचा शतक महोत्सव यावेळी साजरा केला आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्याचा निर्णय तसेच चित्रपट सेनेच्या सदस्यांना विमा वाटप याबद्दल बच्चन यांनी कौतुक केले. त्याआधी हे दोघे दिग्गज भेटले त्यावेळी वयाने मोठे असलेल्या अमिताभ यांचे राज ठाकरे यांनी पायापडून आशीर्वाद घेतले. यावेळी अमिताभ बच्चन हेही थोडे वाकले आणि राज यांना हात दिला. तोपर्यंत हे दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेलेच.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.