www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
चित्रपट अभिनेता आमिर खानला सिनेमाचा इतिहास वाचायचा आहे. आमिरने काल झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपलं मत व्यक्त केलंय.
बिरेन कोठारी यांच्या `सागर मुव्हीटोन` या पुस्तकाचं प्रकाशन आमीरच्या हस्ते झालं. त्यावेळी आमिर खान बोलत होता. `आपल्या देशात आपण इतिहासाबद्दल निष्काळजीने वागतो. ऐतिहासिक दस्ताएवजांचे जतन आपण करत नाही. ऐतिहासिक दस्ताएवजांचे जतन झाले पाहिजे. मला चित्रपटाक्षेत्राचा इतिहास वाचायचा आहे`, अशा शब्दांत आमीर खानने आपलं मत व्यक्त केलं.
आमिरच्या मते भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात कोणती आव्हानं होती, याची माहिती आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या जीवनाची संपूर्ण माहिती यांचे जतन व्हायला हवं, असं आमिरला वाटतंय.
आमिरनं त्याच्या मामाला म्हणजेच नासिर हुसेन यांना आपले अनुभव लिहून ठेवण्याची विनंती केली होती. मात्र नासिर अंकलने आमिरचा हा लाड काही पुरवला नाही, अशी कोपरखळीही त्यानं यावेळी मारलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.