www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दबंग खान आणि शाहरुख खानमध्ये तणावाच्या चर्चा नेहमीच रंगतात, असं असलं तरी शाहरुख सलमानच्या बिग बॉसचा चांगलाच फॅन आहे. दुबईत पत्रकारांसोबत बोलतांना शाहरुखनं सलमानचा शो बिग बॉसची स्तुती तर केलीच शिवाय संधी मिळाल्यास त्यात सहभागी होण्याची इच्छाही दर्शविली.
आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख बिग बॉसमध्ये येऊ शकतो. आमच्या दोघांमध्ये कोणतंही शीत युद्ध सुरू नाही, असंही शाहरुख म्हणाला. बिग बॉसच्या सिझन ७चं लाँचिंग करतांना सलमाननं हे म्हटलं होतं की, शाहरुखची इच्छा असेल तर तो बिग बॉसमध्ये येऊन आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करु शकतो. सलमानच्या याच ऑफरवर शाहरुखनं पॉझिटिव्ह उत्तर दिलं.
शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘हॅपी न्यू ईयर’ आहे. त्यामुळंच आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख बिग बॉसच्या घरात येईल, असा अंदाज वर्तवला जातोय. यंदा ईदच्या इफ्तार पार्टीदरम्यान शाहरुख आणि सलमान एकत्र दिसले. तेव्हापासून त्यांच्यातलं अंतर कमी होत असल्याची चर्चा आहे.
तेव्हा यंदा स्वर्ग आणि नर्कची संकल्पना मांडणाऱ्या बिग बॉसच्या घरात हे दोन खान एकत्र येतात का? याकडे दोघांच्याही फॅन्सचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.