एक हात वर करुन नक्कल करत होता YouTuber; संतापलेल्या साधूने काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल

Mahakumbh Viral Video: महाकुंभमेळ्यात एकीकडे लोक आस्थेची डुबकी लगावत असताना दुसरीकडे काही युट्यूबर हातात मोबाइल फोन घेऊन व्हिडीओ काढत आहेत. यादरम्यान एका युट्यूबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 30, 2025, 09:05 PM IST
एक हात वर करुन नक्कल करत होता YouTuber; संतापलेल्या साधूने काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल title=

Mahakumbh Viral Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी आलेल्या महाकुंभमेळ्यात देश-विदेशातील करोडो लोक हजेरी लावत आहेत. महाकुंभमेळ्यातील अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत एक साधू तरुणाच्या थोबाडीत लगावताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्याच्यावर कमेंट करत आहेत. काहीजण यामागील कारण विचारत असता, काहीजण त्यांनीयोग्य केल्याचं सांगत आहेत. 

महाकुंभमेळ्यात एकीकडे लोक आस्थेची डुबकी लगावत असताना दुसरीकडे काही युट्यूबर हातात मोबाइल फोन घेऊन प्रसिद्ध होण्याच्या प्रयत्नात आहेत. यादरम्यान एका युट्यूबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, "भाईने बाबांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक कानाखाली मिळाली". 

रिपोर्टनुसार, बाबाने ज्या तरुणाला कानाखाली मारली आहे तो एक युट्यूबर आहे. तो हवेत हात उचलून महाकाल गिरी बाबाची नक्कल करत कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न करत होता. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केली असून काहींनी साधूने तरुणाला कानाखाली लावून अगदी योग्य केल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. एकाने लिहिलं आहे की, "कानाखाली का मारली?". तर एका युजरने लिहिलं आहे की, "बाबांनी एकदम योग्य केलं. हे लोक जे सेल्फी आणि रीलच्या नशेत आहेत ते असाच त्रास देत राहतात. ते आपल्या कॅमेऱ्यांसह प्रत्येक ठिकाणी घुसतात. त्यांना मारलंच पाहिजे". तिसऱ्याने लिहिलं आहे की, 'तो ज्या योग्यतेचा होता, तेच मिळालं'.

कथित यूट्यूबरला थप्पड मारणारी व्यक्ती म्हणजे महाकाल गिरी बाबा आहेत ज्यांनी आपला संकल्प दाखवण्यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून एक हात वर ठेवला आहे. मध्य प्रदेशातून आलेल्या महाकाल गिरी बाबा यांनी गायींचे रक्षण आणि धर्माचे रक्षण करण्याची आजीवन प्रतिज्ञा घेतली आहे. अनेक वर्षांच्या तपश्चर्येमुळे हातावरची नखे खूप वाढली आहेत, पण तपश्चर्या करताना नखे ​​कापली जात नाहीत. या साधनेमुळे लोक त्यांना हठयोगी म्हणू लागले आहेत.