केदारनाथ मंदिराचे सर्वात मोठे न उलगडलेले रहस्य! विज्ञानाला चॅलेंज देणारे 1200 वर्षे जुनं प्राचीन मंदिर

Kedarnath Temple Mystery : केदारनाथ मंदिर हे भारतातील रहस्यमयी मंदिर आहे. 1200 वर्ष जुनं हे प्राचीन मंदिर थेट विज्ञानाला चॅलेंज देते. 

वनिता कांबळे | Updated: Jan 30, 2025, 08:47 PM IST
केदारनाथ मंदिराचे सर्वात मोठे न उलगडलेले रहस्य! विज्ञानाला चॅलेंज देणारे 1200 वर्षे जुनं प्राचीन मंदिर  title=

Kedarnath Temple : हिमालय पवर्ताच्या कुशीच उंचीवर असलेले केदारनाथ मंदिर हे देशातील सर्वात पवित्र शिव मंदिरांपैकी एक आहे. हे प्राचीन मंदिर 1200 वर्षांहून अधिक जुने आहे.  केदारनाथ मंदिर नेमकं कधी बांधले कोणाला माहीत नाही. केदारनाथ मंदिराबाबतचे हे सर्वात मोठं रहस्य अद्याप उलगडलेले नाही. ऐतिहासिक ग्रंथ आणि दंतकथांमध्ये त्याच्या बांधकामाबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. मात्र, याबाबत कोणताच ठोस पुरावा नाही.  महाभारतातील पांडवांनी हे मंदिर बांधले अशी देखील अख्यायिका आहे. तर, याचा जीर्णोद्धार आदि शंकराचार्यांनी केला असे अनेकजण मानतात. भारतातील हे रहस्यमयी मंदिर थेट विज्ञानाला चॅलेंज देते. जाणून घेऊया या मंदिराविषयची न उलगडलेली रहस्य.

हे देखील वाचा... भविष्यवाणीने जगाला धडकी भरवणाऱ्या बाब वेंगाचे खरं सत्य कुणालच माहित नाही? आयुष्य म्हणजे मोठ रहस्य

समुद्रसपाटीपासून 11,755 फूट (3,583 मीटर) उंचीवर असलेले केदरनाथ मंदिर वास्तुकलेचा अद्भूत चमत्कार देखील मानले जाते. हे मंदिर मोठमोठ्या दगडी गोट्यांनी बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामात कुठेही सिमेंट किंवा कोणत्याही आधुनिक जॉईनिंग केमिकल वापर करण्यात आलेला नाही.  या मंदिराचे बांधकाम इतके भक्कम आहे की भीषण भूकंप, हिमवर्षाव आणि नैसर्गिक आपत्तींचा देखील या मंदिरावर काहीच परिणाम झालेला नाही. हे मंदिर शतकानुशतके तसेच भक्कम स्थितीत आहे. या मंदिराच्या भिंतींवर करण्यात आलेले सुंदर नक्षीकाम आजही त्याची भव्यता दर्शवते.

2013 च्या पुरात केदारनाथ मंदिर चमत्कारिकरित्या वाचले

2013 मध्ये उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला होता. या विनाशकारी पुरात संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला होता.  या नैसर्गिक आपत्तीत मंदिराच्या आजूबाजूच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र मंदिराचे फारसे नुकसान झाले नाही.  केदारनाथ मंदिर या महाप्रलयातही सुरक्षित राहिले. मंदिरामागे 'भीमशिला' नावाचा मोठा दगड विसावायला आला होता, असे मानले जाते. या दगडानेच पुराचे पाणी मंदिरापासून दूर वळवले. स्थानिक याला भगवान शकंराचा चमत्कार मानतात. 

पंच केदारमधील प्रमुख ठिकाणे

केदारनाथ मंदिर हे पंच केदार नावाच्या पाच पवित्र शिवमंदिरांपैकी सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. पौराणिक कथेनुसार, महाभारत युद्धानंतर, पांडव त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान शिवाकडून आशीर्वाद घेण्यासाठी येथे आले. त्यांच्यापासून वाचण्यासाठी भगवान शिवाने बैलाचे (नंदी) रूप धारण केले आणि ते पृथ्वीवर बुडाले. त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागले. केदारनाथ येथे कुबड, तुंगनाथ येथे हात, रुद्रनाथ येथे चेहरा, मध्यमहेश्वर येथे नाभी आणि कल्पेश्वर येथे केस. या पाच मंदिरांना मिळून पंच केदार म्हणतात.

केदारनाथ मंदिराचा प्रवास अतिशय कठिण आहे. कारण हे मंदिर वर्षातील  फक्त सहा महिने म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान भाविकांसाठी खुले असते. प्रचंड थंडी आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात हे मंदिर बंद असते. यावेळी, भगवान केदारनाथची मूर्ती उखीमठ येथे आणली जाते जिथे त्यांची पूजा केली जाते.