दिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन

दिग्दर्शक संजय सुरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पुण्यात निधन झाले. चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

Updated: Sep 27, 2012, 01:59 PM IST

www.24taas.com, पुणे
दिग्दर्शक संजय सुरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पुण्यात निधन झाले. चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने सेनापती बापट मार्गावरील रत्ना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली.
चौकट राजा, सातच्या आत घरात, आनंदाचे झाड, सुखान्त, मास्तर एके मास्तर, सखी, तू तिथं मी हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
शिवाय छोट्या पडद्यावरील अवंतिका, सुकन्या, ऊन पाऊस या गाजलेल्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत अभिनेते सचिन खेडेकर होते. एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने संजय सुरकर पुण्यात होते.