मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या भारतातील 'असहिष्णूतते'च्या वक्तव्यावरून बॉलिवूडमधील अनुपम खेर, ऋषी कपूर यांसारख्या अभिनेत्यांसहीत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. पण, अभिनेता ऋतिक रोशन मात्र या कठिण काळात आमिरला पाठिंबा दर्शवण्यासाठी धावून आलाय.
बुधवारी, आमिरनं आपला आणि आपल्या पत्नीचा हा देश सोडून जाण्याचा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केलंच... सोबतच, आपण केलेल्या वक्तव्यावरही आपण ठाम आहोत, असं त्यानं त्याच्यावर टीका करणाऱ्यांना ठणकावून सांगितलं... आपला हा खुलासा आमिरनं आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्टही केला.
What I learn from this -even when attacked u must find d power to respond and not react! Well done @aamir_khan https://t.co/tquxnFexlS
— Hrithik Roshan (@iHrithik) November 25, 2015
यावर, ऋतिकनं आमिरच्या या भूमिकेचं आणि ठामपणा दाखवल्याबद्दल कौतुक केलंय. आमिर खानला उद्देशून त्यानं 'या संपूर्ण घटनेतून मी हे शिकलोय की जर तुमच्यावर हल्ला झाला तर तुमच्याकडे इतकं सामर्थ्य असायला हवं की त्याचं प्रत्यूत्तर तुम्हाला तर्कपूर्ण पद्धतीनं देता यायला हवं... केवळ प्रतिक्रिया नव्हे... खूप छान आमिर खान!' असं म्हणत ऋतिकनं आमिरचं हे स्पष्टीकरण आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करून आपल्याही चाहत्यांपर्यंत पोहचवलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.