www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल-7च्या सुरवातीच्या काही मॅचमध्ये सहभागी न झालेला प्रवीण कुमार शनिवारी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला. चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध झालेल्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये प्रवीणणं आपली क्षमता सिद्ध केली. यानंतर मात्र तो भावनांना आवर घालू शकला नाही.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावात प्रवीणसाठी खरेदीदारच मिळाला नव्हता. याच गोष्टीचा विचार करत मी आत्तादेखील निराश होतो, असं प्रवीणणं म्हटलंय. ‘मला जेव्हा लिलावत निवडलं गेलं नाही तेव्हा मी खूप निराश झाले होतो. ही मला चक्रावून टाकणारी वेळ होती. मी पहिल्या दीड आठवड्यांपर्यंत निराशेच्याच अवस्थेत होतो. परंतु, यानंतर हळू-हळू सगळं काही सामान्य झालं’ असं प्रवीणणं आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटशी बोलताना म्हटलंय.
‘एक वेळ अशीही आली होती जेव्हा मी घरातून बाहेर पडणंच बंद केलं होतं. मी विचार करत होतो की लोक मला भेटतील, माझ्याशी बोलतील आणि त्याचीच भीती वाटत होती की ते मला काय-काय विचारतील? परंतु, हळू-हळू मी या अवस्थेतून बाहेर पडलो आणि नकारात्मकता बाजुला सारली. मी निराश यामुळे होतो की मला एका अशा मंचावर खेळायची संधी मिळाली नव्हती ज्याचा मी अनेक काळासाठी एक भाग होतो’, अशी भावनाही प्रवीणणं यावेळी व्यक्त केली.
मुंबई इंडियन्सनं जखमी फास्ट बॉलर झहीर खान याच्या जागेवर प्रवीणला टीममध्ये संधी दिलीय. यामुळेच प्रवीणला पुन्हा एकदा आयपीएल-7मध्ये खेळण्याची संधी मिळालीय.
मुंबई इंडियन्सचे आभार मानत प्रवीण म्हणतो, ‘मुंबई इंडियन्सनं जेव्हा मला खेळण्याची संधी दिली तेव्हा रात्रभर मला झोप लागली नाही आणि मी अचानक खूप सकारात्मक अनुभव करू लागलो. जेव्हा मला पुन्हा खेळण्याची संधी मिळणार हे उमजलं तो क्षण माझ्यासाठी खूपच खास होता’.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.