www.24taas.com, झी मीडिया, नेपियर, न्यूझीलंड
नेपियर वन-डेमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून २४ रन्सनं पराभवाचा सामना करावा लागला. किवींनी ठेवलेल्या २९३ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना भारतीय २६८ रन्सवरच ऑलआऊट झाली.
विराट कोहलीनं १२३ रन्सची झुंजार सेंच्युरी झळकावली. मात्र, त्याची ही सेंच्युरी व्यर्थ ठरली. विराट कोहली आणि कॅप्टन धोनीचा अपवाद वगळता भारताच्या एकाही बॅट्समनला किवी बॉलर्सचा सामना करता आला नाही. या विजयासह न्यूझीलंडनं पाच वन-डे मॅचेच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे.
तर भारतानं क्रिकेटच्या नव्या सीझनची सुरुवात पराभवनं केली. वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राखण्यासाठी भारतीय टीमला न्यूझीलंडला पराभूत करणं आवश्यक आहे.
दरम्यान, किवींच्या दोन विकेट झटपट गेल्यामुळं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय धोनीचा यशस्वी होणार असं वाटलं होतं. मात्र विल्यम्सन, टेलर आणि अँडरसन या तिघांनी अर्धशतकं करत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला आणि भारतापुढं २९३ धावांचं आव्हान ठेवलं.
भारताच्यावतीनं शामीनं चार तर भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक विकेट घेतली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात टीम इंडियाने १५० धावा होण्याआधीच शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना हे महत्त्वाचे फलंदाज गमावले. न्यूझीलंडच्यावतीनं मॅकक्लननं चार, अँडरसनने दोन तर साउथी, मिलने आणि विल्यम्सननं प्रत्येकी एक विकेट घेतली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.