www.24taas.com, झी मीडिया, ऑकलंड
भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या टेस्टच्या तिस-या दिवशी रंगतदार अवस्था निर्माण झाली आहे. तिस-या दिवसअखेर टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज आहे. तत्पूर्वी टीम इंडिया २०२ तर न्यूझीलंड टीम केवळ १०५ रन्सवरच ऑल आऊट झाली.
तिस-या दिवशी ऑकलंड टेस्टमध्ये रंगतदार अवस्था निर्माण झाली आहे. बॅकफूट असलेल्या धोनी एँड ब्रिगेडने तिस-या दिवशी कमबॅक केल असून टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज आहे. तिस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडिया १ विकेट गमावत ८७ रन्सवर खेळत होती. भारताकडून शिखर धवन ४९ तर चेतेश्वर पुजारा २२ रन्सवर नॉट आऊट आहेत. तत्पूर्वी दुस-या दिवसाच्या ४ विकेट्स १३० रन्सच्या पुढे खेळताना टीम इंडिया २०२ रन्सवरच ऑल आऊट झाली.
यानंतर टीम इंडियाच्या बॉलर्सने जबरदस्त कामगिरी करत किवींना केवळ १०५ रन्समध्येच गुंडाळण्याची किमया केली. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी आणि ईशांत शर्माने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर झहीर खानने २ विकेट्स घेतल्या. तिस-या दिवशी बॉलर्सना मदतगार झालेल्या पिचवर एकूण १७ विकेट्स गेल्या. टीम इंडियाने दुस-या इनिंगमध्ये मुरली विजयच्या रुपात आपली पहिली विकेट गमावली. मुरली विजय १३रन्सवर टीम साऊदीचा शिकार ठरला.
खरतर टीम इंडियाला ऑकलंड टेस्ट जिंकण्याची संधी आहे. मात्र टीम इंडियाचे बॅट्समन किवी बॉलर्सचा कसा मुकाबला करतात यावर टीम इंडियाच भवितव्य अवलंबून असेल. तिस-या दिवशी बॉलर्सने आपल वर्चस्व दाखवल्याने आगामी दोन दिवस बॉलर्सचाच दबदबा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळेच अशा निर्णायक क्षणी टीम इंडियाच्या बॅट्समनसमोर किवी बॉलर्सचा धैर्याने मुकाबला करण्याच आव्हान उभं ठाकल आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.