असा झाला मुंबई इंडियन्सचा रोमांचक विजय

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला आयपीएलचा शेवटचा लीग सामना, या टूर्नामेंटचा सर्वात रोमांचक सामना ठरला आहे.

Updated: May 26, 2014, 12:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला आयपीएलचा शेवटचा लीग सामना, या टूर्नामेंटचा सर्वात रोमांचक सामना ठरला आहे.
अतिशय नाटकीय अंदाजात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला पाच विकेटने हरवलं आहे. या विजयामुळे मुंबई इंडियन्स प्ले ऑफ सामन्यासाठी क्वालीफाय झाली आहे.
नेट रन रेटच्या आधारावर टार्गेट
राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा बॅटिंग केली, 20 षटकात चार विकेट गमावल्या, आणि 189 रन्सची मोठी धावसंख्या राजस्थानने उभारली. नेट रन रेटच्या आधारावर प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यासाठीही टार्गेट मिळतं, मुंबई इंडियन्सला 14.3 षटकांत म्हणजेच 87 चेंडूत हे टार्गेट मिळवणं आवश्यक होतं.
प्ले ऑफमध्ये धडक मारण्यासाठी मुंबई इंडियन्सला 87 चेंडूत 190 रन्स करायचे होते. मात्र मुंबईचा डाव सुरू असतांना 87 व्या चेंडूवर अंबाती रायडू आऊट झाला. यानंतर मॅच रेफरीने सांगितलं, या पुढील चेंडूत म्हणजे एका चेंडूत मुंबईने चार धावा केल्या, तर मुंबई इंडियन्स `प्ले ऑफ`मध्ये पोहोचणार
आदित्यने `तारे` चमकवले
अंबाती रायडूनंतर आदित्य तारे बॅटिंगला आला, जेन्स फॉकनरने लेग स्टंपवर फुलटॉस बॉल टाकला आणि आदित्य तारेने कडक षटकार लगावला आणि आदित्य तारेने सर्वांच्या डोळ्यासमोर तारे चमकवले. मुंबई इंडियन्स आता फायनलमध्ये पोहोचलीय. आता 28 मे रोजी मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज सोबत होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.