www.24taas.com झी मीडिया, पणजी
“माझ्या आयुष्यावर क्रिकेटचा एवढा प्रभाव पडलाय की, त्यामुळं मी एक चांगला व्यक्ती बनलो”, हे बोललाय भारताचा माजी कप्तान द वॉल राहुल द्रविड. आज एका कार्यक्रमात त्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्याला ही जाणीव क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या दीड वर्षानंतर झाली असल्याचंही तो म्हणाला.
बीआयईटीएस पिलानी गोवा कॅम्पसमधील एका दीक्षांत सोहळ्यासाठी राहुल उपस्थित होता. “क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दीड वर्षांनी माझ्या लक्षात आलं की, क्रिकेटमुळं मी आता एक चांगला व्यक्ती झालो आहे. मी यशापयशातून अनेक गोष्टी शिकलोय”, असं राहुल द्रविड म्हणाला.
द्रविड बोलत असतांना त्यानं विषेश करून आपल्या शाळेचे प्रिन्सिपल फादर कोल्हे यांचं नाव घेतलं. तो म्हणाला त्यांचे वडील माझ्या खेळाची नेहमी प्रशंसा करीत असे.
द्रविडच्या मते, “यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आपल्या समोर असतात. जगासमोर नंबर वन होण्याची काही गरज नाही. आपल्या स्वतःच्या नजरेत नंबर वन बना आणि जे ध्येय आहे ते मिळवा”, असा मंत्र त्यानं उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.