www.zee24taas.com, झी मिडीया, मुंबई
`ईएसपीएन क्रिक इन्फो पुरस्कर` सोहळ्यात सचिन तेंडुलकरला `क्रिकेटर ऑफ द जनरेशन अॅवार्ड`ने सन्मानित करण्यात आलयं.
शुक्रवारी पार पडलेल्या या सोहळ्यात `ईएसपीएन क्रिक इन्फो पुरस्करा`साठी फिरकी गोलंदाज शेन वार्न आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस यांची नावे नामांकनासाठी आघाडीवर होती.
`ईएसपीएन क्रिकइन्फो`च्या वेबसाइट स्थापनेला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खेळा़डूंना सन्मानित करण्यात आलयं. १९९३ ते २०१३ मधील दिग्गज खेळाडूंना सन्मानित केलयं.
`प्रामाणिकपणे सांगतो, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दचं नाहीत. मला ईएसपीएन क्रिक इन्फो पुरस्करांसाठी पात्र बनवले. त्यामुळे मी ईएसपीएन क्रिक इन्फोचा आभारी आहे.
मार्टीन क्रो आणि राहुल द्रविड यांनी मला सांगितलं तेव्हा कळचं नाही की, मी काय प्रतिक्रिया देऊ असे, पुरस्कार मिळाल्यानंतर सचिनने म्हटलं.
कॅलिसबद्दल सांगताना सचिन म्हणाला, १९९६ मध्ये मी कॅलिसला पहिल्यांदा भेटलो. मला वाटलं तो एक चांगला अष्टपैलू होऊ शकतो. मात्र त्यानंतर कॅलिसने फलंदाजीचे तंत्र बदले आणि गोलंदाजीमध्ये एक अविश्वसनीय कामगिरी केलीय.
सचिन शेन वॉर्नबद्दल म्हणाला, पहिल्यांदा मी १९९२ मध्ये त्यांच्या विरुद्ध सामना खेळलो. मात्र आपल्याला अंदाज असेलच की, शेन वॉन त्यांच्या खेळात निपुण नव्हता.
दुसऱ्यांदा जेव्हा मी श्रीलंकामधील सामन्यात त्यांच्या फिरकी गोलंदाजीवर खेळलो आणि नशिबाने वाचलो. वार्न माझ्याजवळ आला आणि मला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्या सामन्यानतंर आम्ही चांगले मित्र बनलो.
ईएसपीएन क्रिक इन्फो सोहळ्यात टेस्ट आणि एकदिवसीय सर्वश्रेष्ठ फलंदाजी पुरस्कार शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना देऊन सन्मानित करण्यात आलयं.
तर कसोटी आणि एकदिवसीय गोलंदाजी पुरस्करासाठी मिचेल जॉन्सन आणि पाकचा खेळाडू शाहिद आफ्रिदीला देऊन गौरविण्यात आलयं.
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सर्वोत्तम नवोदीत खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलयं. तर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली समिती पुरस्कारासाठी खेळाडू तारक सिन्हाची निवड झालीयं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.