www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना – श्रीसंत, अंकीत चव्हाण आणि अजित चंदेलिया यांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक करण्यात आलीय. काय आहे हे स्पॉट फिक्सिंग प्रकरण... स्पॉट फिक्सिंग म्हणजे नेमकं काय… पाहुयात...
मॅच फिक्सिंग म्हणजे संपूर्ण सामन्याचा निकाल फिक्स करणे तर स्पॉट फिक्सिंगमध्ये सामन्यातील एका-एका चेंडूवरील घडामोडी फिक्स केल्या जातात. उदाहरणार्थ, एखाद्या ओव्हरमध्ये ‘नो बॉल’ टाकणं किंवा किंवा वाईड बॉल टाकणं किंवा कॅच सोडणं...
क्रिकेटमध्ये सध्या स्पॉट फिक्सिंग वेगाने वाढतं आहे. यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दणका बसला आहे. पाकिस्तानचे खेळाडू मोहम्मद आमिर, सलमान बट्ट आणि मोहम्मद आसिफ यांना लंडनमधील न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे या तिघांना जेलची हवा खावी लागली. हे तिन्ही खेळाडू शिक्षा भोगून बाहेर आले आहेत.
कुणाला होतो स्पॉट फिक्सिंगचा फायदा?
सट्टाबाजी ही काही भारतात नवीन नाही. अर्थातच, अनुभवी आणि फिक्सिंगमध्ये सहभागी असलेल्या बुकींना चांगलं ठाऊक असतं की बॉलर किंवा बॅटसमन पुढच्या ओव्हरमध्ये काय करणार आहे. त्याचा फायदा उचलणंही त्याला चांगलंच कळतं. अशावेळी प्रत्येक ओव्हरवरही पैसे लावले जातात.
भारतात केवळ घोड्यांच्या शर्यतीत ‘बेटींग’ कायदेशीर आहे. पण मार्केटमध्ये क्रिकेटमध्येही बेटींग चालतं आणि तेही मोठ्या प्रमाणात हे सांगण्याची गरज नाहीच.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.