www.24taas.com , झी मीडिया, ठाणे
सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे कधी होणार ? हा प्रश्न कायम आहे. महापालिका घन कचऱ्यावर ११० कोटी रुपये खर्च करते. तरीही शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. यावर ठाणेकर नाराज आहेत. तर महापालिका मात्र आम्ही शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केलाय, असा दावा करतेय.
मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात अनेक समस्या आहेत. सर्वात मोठी समस्या म्हणजे कचऱ्याची. आधीच दिवा गावात डंपिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा आहेत. अनेक नाक्यावर कचरा कुंडी भरून
रुजू झालेल्या प्रत्येक पालिका आयुक्तांचे स्वप्न होते की ठाणे शहराला सुंदर बनवायचे. परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालंच नाही. वरिष्ठ अधिकारी वर्ग मात्र स्वच्छता असल्याचा दावा करतायेत.
कचऱ्यामुळे अनेक नागरिकांना आजारांना सामोरं जावं लागतंय. महापालिकेत डंपिगचा प्रश्न ऐरणीवर असताना
शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिग दिसत आहेत. गणेशोत्सव काळात सुमारे ३६ टन निर्माल्य जमा झालंय. ठाण्याचं रुप खुलवण्यासाठी महापालिका, सामाजिक संस्था आणि नागरीकांनी एकत्र येऊन वाटचाल करण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.