www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेची उमेदवारी धुडकावून अभिनेता डॉ. अमोल कोल्हे सेनेत दाखल झालात. त्यामुळे राज ठाकरेंना जोरदार धक्का दिलाय. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय, असं म्हणायला हरकत नाही.
'मराठी नेतृत्व आक्रमक पण संयमी असावं... असं वाटलं म्हणूनच शिवसेनेत दाखल झाले' अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी मनसे नेतृत्वावर टीका केलीय.
डॉ. अमोल कोल्हे यांचं शिवसेनेत स्वागत करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला आनंद व्यक्त केलाय. `माझा सहकारी म्हणून स्वीकार केलाय... साहजिकच एक चांगली जबाबदारी मी त्यांच्या खांद्यावर सोपवणार... अमोल यांनी कोणतीही मागणी न करता ते शिवसेनेत दाखल झालेत` असं त्यांनी म्हटलंय.
निवडणुकीसाठी सेलिब्रिटी चेहरे का लागतात? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी `शिवसेनेचं कलाकारांशी काही वावगं नाही... स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच एक कलाकार होते...` असं उत्तर दिलंय.
राष्ट्रवादी हा गद्दारांचाच पक्ष - उद्धव
एकेकाळी शरद पवारांचा महाराष्ट्रात दबदबा होता... पण, आता त्यांना `कुणी उमेदवार देता का उमेदवार` असं म्हणत फिरावं लागतंय.
राहुल नार्वेकर यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, राहुल राष्ट्रवादीचा जावई होताच आता तो घरजावई झालाय एव्हढंच... असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खरमरीत टीका केलीय.
`राष्ट्रवादी हा गद्दारांचा पक्ष हे तुम्ही खोडून दाखवा... शिवसेनेच्या गद्दारांनाच त्यांनी उमेदवारी दिलीय. भाड्याने उमेदवार घेण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. शिवसेनेत खाऊन पिऊन - ढेकर देऊन सेनेतली लोक तिकडे गेलेली आहेत' असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.