www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली आहे. तर विद्यमान भाजप अध्यक्ष रामनाथ सिंग यांना लखनऊमधून रिंगणात उतरविले आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समिती बैठक रात्री १०.३० वाजण्याच्या दरम्यान संपली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. उत्तर प्रदेशातील ५० जागांसाठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवार निश्चित केले.
उमेदवारांची नावे
- वाराणसी - नरेंद्र मोदी
- कानपूर - मुरली मनोहर जोशी
- अमृतसर - अरूण जेटली
- लखनऊ - रामनाथ सिंग
- अंबाला - रतनलाल कटारिया
- रोहतक - ओमप्रकाश धनखड़
- कुरुक्षेत्र -राजकुमार सैनी,
- फरीदाबाद - कृष्णपाल गुर्जर
- झांसी - उमा भारती,
- पिलीभीत - मेनका गांधी,
- गोरखपूर - योगी आदित्यनाथ,
- फूलपूर - सिद्धार्थ नाथ सिंह,
- सुल्तानपुर - वरुण गांधी,
- गुड़गांव - राव इंद्रजीत सिंह,
- चांदनी चौक - हर्ष वर्धन,
- नवी दिल्ली - मिनाक्षी लेखी,
- उत्तर पूर्व दिल्ली - मनोज तिवारी,
- उत्तर पश्चिमी दिल्ली - उदित राज
- पश्चिम दिल्ली - परवेश शर्मा
- देवरिया - कलराज मिश्र
- पटणा साहिब - शत्रुघ्न सिन्हा
- चंडीगड - किरण खेर
- फैजाबाद - लल्लू सिंह
- दक्षिण दिल्ली - रमेश विधूड़ी,
- पूर्वी दिल्ली - महेश गिरि
- जौनपूर - के. पी सिंह
- नोएडा - महेश शर्मा,
- इटा - राजबीर सिंह
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.