www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपसाठी नवीन अध्यक्षाचा शोध सुरु झालाय. मोदींच्या कॅबिनेटमध्ये विद्यमान भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.
याच संदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजप अध्यक्षपदाच्या रेसमध्ये जे. पी. नड्डा आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या पार्श्वभूमीवर अमित शहा, जे. पी. नड्डा, व्यंकय्या नायडू यांनी गुजरात भवनमध्ये मोदींची भेट घेतली. यानंतर अमित शहा यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतलीय. मेनका गांधी यांनीही राजनाथ सिंह यांची भेट घेतलीय.
एक नजर टाकुयात... जे. पी. नड्डा यांच्या कारकिर्दीवर
• जे. पी. नड्डा हे नरेंद्र मोदी, अमित शहा तसंच राजनाथ सिंहा यांचे निकटवर्तीय मानले जातात
• नड्डा हे मूळचे हिमाचल प्रदेशचे रहिवासी आहेत.
• हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी पर्यावरण मंत्रीपद भूषवलंय.
• पाटणा युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलंय.
• नड्डा यांनी कॉलेज राजकारणातही सक्रीय सहभाग नोंदवला होता.
• ‘जेपीं’च्या आंदोलनातही नड्डा यांनी हिरहिरीने सहभाग घेतला होता.
• अमित शाह यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचं कामही त्यांनी पाहिलंय.
• नड्डा यांच्या संगठात्मक कौशल्याचा भाजप नेते कौतुकानं उल्लेख करतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.