www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
गुजरात – 62%
पश्चिम बंगाल – 81.35%
दादरा नगर हवेली - 85%
बिहार – 60%
पंजाब 73%
दीव-दमण – 76%
जम्मू-काश्मीर – 25.62%
आंध्रप्रदेश – 70%
उत्तर प्रदेश – 57.10%
सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
> लखनऊ - २२.५ %
> कानपूर - २३.४६ %
> पश्चिम बंगाल - ४४ %
> उत्तर प्रदेश (बाराबंकी) - २७ %
> फतेहपूर - २२ %
> हमीरपूर - २२%
> पंजाब - १४ % (सकाळी १० वाजेपर्यंत)
> बिहार - १९ % (सकाळी १० वाजेपर्यंत)
सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे.
> पश्चिम बंगाल- २५ %
> बिहार - १९ %
> उत्तर प्रदेश - ९.३५ %
> गुजरात - ९ %
> पंजाब - १४ %(सकाळी १० वाजेपर्यंत)
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८९ जागांवर आज मतदान पार पडत आहे. गुजरातसह, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अत्यंत बड्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
गुजरात २६, पंजाब १३, बिहार, आंध्रप्रदेश १७, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ९, बिहार ७ आणि जम्मू काश्मिर, दादरा, नगर हवेली आणि दमन दीवच्या प्रत्येकी एका जागेवर मतदान होतंय.
आज ज्या ८९ जागांवर मतदान होत आहे त्यापैकी २००९मध्ये यूपीएने ४४ जागा, एनडीएने ३० जागा आणि इतरांनी १५ जागा जिंकल्या होत्या. ८९ जागांच्या मतदानासह ४३८ जागांवरील मतदान आज पूर्ण होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.