www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
पुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत. रत्नागिरीत वर्षानुवर्ष मतदान करणा-या ज्येष्ठ नागरिकांचं नाव यादीत नव्हतं. त्यामुळे पुन्हा मतदार यादीतील गोंधळ पुढे आला आहे.
कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गातील अनेक मतदारांबरोबरच नव्याने नोंद करण्यात आलेल्या अनेक युवकांचं नावही मदारांची नावे नाहीत. त्यामुळे नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. यादीत नावच नसल्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाचं वातावरण होतं. अनेक मतदार निवडणूक आयोगाचं ओळखपत्र घेऊन मतदार केंद्रावर पोहोचले होते. मात्र त्यांना ओळखपत्र असूनही यादीत नाव नसल्यामुळे मतदान न करता परतावं लागलं.
रत्नागिरी जिल्हा निवडणूक विभागाने घातलेल्या गोंधळाचा फटका मतदारसंघातल्या जवळपास प्रत्येक मतदानकेंद्रावर बसल्याचं पाहायला मिळालं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 1904 मतदान केंद्रांवर 13 लाख 63 हजाराहून अधिक कोकणवासिय आपल्या मतदानाचा हक्क बजावतायेत. एकूण 10 हजार 521 कर्मचारी कार्यरत आहेत. अनेक मतदारांची नाव मतदारयादीत नसल्याने नागरिकांची निराशा झालीय.
दरम्यान, पुण्यात मतदार याद्यांमधला घोळ उघड झालाय. हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचं पुढं आलंय. यामुळं शिवाजीनगर परिसरातील मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. मतदानाला गेले असता यादीत नावच नसल्यानं अनेक सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
तसंच मतदानाच्या हक्कापासूनही वंचित राहावे लागल्यामुळं नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळं यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. गायक-संगितकार सलील कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची नावेही मतदार यादीतून गायब आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.