www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभा मतदार संघनिहाय उद्धव ठाकरे महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेणारेत.
एकेकाळी नाशिक हा शिवसेनेचा गड होता परंतु आता मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषत: भुजबळांचं वर्चस्व याठिकाणी दिसून येत असल्यानं उद्धव ठाकरेंनी स्वत: नाशिककडे लक्ष केंद्रित केलंय. त्याचाच भाग म्हणून आजच्या दौऱ्याकडे बघितलं जातंय.
त्याचबरोबर शिर्डीचे उमेदवार बबनराव घोलप यांना मुंबई सत्र न्यायालयानं ३ वर्षांची शिक्षा ठोठावल्यानं त्यांच्या जागी नव्या उमेदवाराचं नाव जाहीर होण्याची शक्यताही व्यक्त होतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.