मुंबई : अनेक लोकांना माहिती माहीत की, गरम दूध पिण्याचे फायदे. जर तुम्हाला रात्री थकावा वाटत असेल आणि झोप लागत नसेल, तसेच कपामुळे तुम्ही हैराण असाल तर गरम दूध यापासून तुमची सुटका करते.
अधिक वाचा : रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी का घ्यावे?
दूध पिण्यामुळे आरोग्यसाठी ते कधी जरुरीचे आहे, हे त्याचे लाभ पाहिल्यावर लक्षात येईल. शुक्राणू वाढविण्यासाठी गरम दूध मदत करते. गरम दूध आणि मध पिणे कधीही चांगले. मात्र, दुधात साखर टाकून पिणे अरोग्य आहे. कारण यामुळे दुधातून मिळणारे कॅल्शिअम कमी करते तसेच कप वाढीस निमंत्रण देत. त्यामुळे दुधाची गोडी वाढविण्याठी त्यात मध टाका.
कॅल्शिअमची कमी असेल तर...
कॅल्शिअम कमी असेल तर गरम दूध पिणे केव्हाही चांगले. त्यामुळे दातातील दुखणे कमी होते. तसेच कॅल्शिअम वाढीला मदत होते. गरम दुधात कॅल्शिअम, आयोडीन आणि फॉस्फोरस अधिक असतो. त्यामुळे दातांच्या हड्डी अधिक मजबूत होतात. जेवण्याच्या मध्ये गरम दूध पिण्यामुळे दातांचे कोटिंग चांगले राहते.
अधिक वाचा : बटाटे खाण्याचे हे सहा फायदे तुम्हाला अचंबित करतील...
तणाव कमी होण्यास मदत
आपल्याला जास्त तणाव आणि थकवा जाणवत असेल त्यावेळी गरम दूध घ्या. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होतात. गरम दुधामुळे स्नायू आणि मज्जातंतू तणावापासून मुक्त होतात.
एनर्जी वाढण्यास मदत
थकावा दूर करण्यासाठी गरम दूध मदत करते. शिवाय पुन्हा आपली एनर्जी वाढते. गरम दुधामुळे शरिराला ऊर्जा मिळते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जाताना गरम दूध पिण्यास दिले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली होते.
अधिक वाचा : सावधान! सॉफ्ट ड्रिंकमध्ये असतात हे ६ घातक केमिकल्स!
मासिक पाळीत तणाव कमी होतो
काही महिलांना मासिक पाळीत तणाव वाढतो. हा तणाव कमी करण्यासाठी एक ग्लास गरम दूध पिणे चांगले. त्यामुळे तुम्ही पुन्हा तुचमा मूठमध्ये येता.
पूरक पोषण आहार
अनेक लोक अवेळी जेवण घेतात. तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी गरम दूध चांगले. गरम दूध हे पूरक पोषण आहाराचे काम करते. गरम दूध असा आहार आहे की, शरीरात ज्याची कमतरता आहे ती कमतरा दूध भरुन काढते.
झोप लागत नसेल तर...
तुम्हाला रात्री चांगली झोप लागत नसेल तर गरम दूध घ्या. दुधामुळे अमिनो अॅसिड मिळते त्यामुळे मेंदू शांत होतो आणि झोप चांगली लागते.
खोकला असेल तर
गरम दूध तुमचे शरीर रिचार्ज करते. खोकला लागल्यानंतर गळ्यात जंतूचा संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग रोखण्याचे काम गरम दूध करते.
पाण्याची कमतरता दूर करते
आपल्या शरीराला नेहमी पाण्याची आवश्यता असते. मात्र, अनेक लोक एसीमध्ये काम करताना पाणी पित नाहीत. किंवा पाणी पिण्याचे टाळाटाळ करता. गरम दूध पिण्यामुळे पाण्याची कमतरता भरुन येते. व्यायाम करत असाल तर गरम दूध प्या. त्यामुळे शरीरातील एलेक्ट्रोलाईटची कमतरता भरुन निघते आणि तुमचे शरीर ताजेतवान होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.