लठ्ठपणा केवळ फॅट्समुळेच नाही तर प्रदूषणामुळेही वाढतो

फॅट्सयुक्त जेवणामुळेच नाही तर प्रदूषणामुळे सुद्धा लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो. एका अभ्यासानुसार वातावरणात असलेले काही प्रदूषक तत्त्व लठ्ठपणा वाढविण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. 

Updated: Mar 2, 2015, 06:15 PM IST
लठ्ठपणा केवळ फॅट्समुळेच नाही तर प्रदूषणामुळेही वाढतो title=

लंडन: फॅट्सयुक्त जेवणामुळेच नाही तर प्रदूषणामुळे सुद्धा लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो. एका अभ्यासानुसार वातावरणात असलेले काही प्रदूषक तत्त्व लठ्ठपणा वाढविण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. 

स्पेनच्या ग्रेनाडा विश्वविद्यालयातील एका अध्ययनाचे मुख्य लेखक जुआन प्रेडो एरेबोला यांनी सांगितलं की, असे व्यक्ती ज्यांच्या शरीरात जैविक प्रदूषक (पीओपी)ची मात्रा अधिक असते, त्यांच्यात लठ्ठपणा अधिक वाढतो आणि त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची मात्रा अधिक असते. 

हृदय रोगावरही याचा परिणाम होतो. याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी ३०० महिला आमि पुरुषांच्या एडिपोज टिश्यूंमध्ये जमा प्रदूषक तत्त्वांचं विश्लेषण केलं. विशेष म्हणजे पीओपी नष्ट न होता वातावरणात दशकांपर्यंत उपस्थित असतो. 

एरेबोला म्हणाले, पीओपीच्या संपर्कामध्ये मनुष्य आहाराच्या माध्यमातून येतो. पीओपी हळूहळू शरीराच्या मेदयुक्त चरबीमध्ये जमा होतो. 'एनव्हायरर्नमेंटल पोल्यूशन' जर्नलमध्ये हे अध्ययन प्रकाशित झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.