मुंबई : त्वचेचा रंग उजळवण्यासाठी जास्त मेहनत आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही साध्या आणि सोपे घरगुती उपाय करून तुम्ही मिळवू शकता गोरी त्वचा.... यासाठी, अगदी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच बेकिंग सोडा, पिकलेली केळी, आंब्याच्या साली यांचा वापर तुम्ही करू शकता.
पाहा, काही साधे आणि सोप्पे उपाय...
बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावावी. फरक तुम्हाला दिसेल.
त्याप्रमाणे पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे.
अॅलोव्हेरा जेलचा म्हणजेच कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे.
तसेच सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.
आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.
साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.
नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल.
पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.