रायपूर: स्वाइन फ्लूपासून वाचण्यासाठी हर्बल टी उपयुक्त ठरू शकते. हा चहा आपल्या किचनमध्ये अगदी सोप्यापद्धतीनं आपण बनवू शकतो. हा हर्बल चहा लवंग, विलायची, सुंठ, हळद, दालचिनी, गिलौय, तुळस, काळीमिर्च आणि पिपळी एकामात्रेत मिसळून चूर्ण बनवायचं.
हे चूर्ण दोन ग्राम एक कप चहामध्ये टाकून त्याला उकळून सकाळ-संध्याकाळी प्यावं. त्यामुळं शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि स्वाइन फ्लू सारख्या आजारापासून आपण वाचू शकतो. सामान्य लोकही हा हर्बल चहा पिऊ शकतात. नेहमी हवामान बदललं की ताप, सर्दी, खोकला यासारख्या समस्या सुरू होतात. मात्र या साध्या-सोप्या उपायानं आपण त्यापासून दूर राहू शकतो.
काही इतर घरगुती उपाय
- तज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी आणि त्याचा वारंवार वास घेतल्यानं स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो.
- नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणे.
- सितोपलादी चूर्ण, त्रिकुट चूर्ण, लक्ष्मी विलास रस, गोदंती, श्रंग-भस्म इत्यादींचं सेवन वैद्यकीय सल्ल्यानं घ्यावं
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.