मुंबई : कामसूत्र किंवा कामजीवन याकडे अश्लिलता या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. खरंतरं नेटीझन्सची यावर वेगळीच मतं असल्याचं दिसून आलं आहे. जे नेटीझन्स सखोल वाचून बोलतात, त्याचंही मत यावर वेगळं आहे.
जनमानसात कामसूत्राची प्रतिमा ...
कामसूत्र हा शब्द जरी एखाद्या बातमीत आला, तरी अनेकांना आश्चर्य वाटतं, कामसूत्र हे साहित्यिक दृष्ट्या कितीही सुंदर असलं/ तरी ते प्रकाशित करावं किंवा नाही, हे जनमानसात असलेल्या एकूणच प्रतिमेमुळे वाटतं असतं.
कामसूत्र पुस्तकाचं प्रकाशन...
या विषयावर ई-साहित्य प्रकाशित करावे किंवा नाही यावर ई साहित्य प्रतिष्ठानने नेटिझन्सचा कौल मागवला, आणि अर्ध्या तासात हजारो प्रतिक्रिया आल्या. ई साहित्यने कामसूत्र हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
कामसूत्र अश्लील अंगाने जोडला गेल्याने अडचणी...
'काम' हा आयुष्यातील महत्वाचा घटक आहे, यावर चर्चा का होत नाही, कारण धर्म, अर्ध आणि काम यानंतर आयुष्यात मोक्ष मिळतो. मात्र कामसूत्र या नावाभोवती वाईट-अश्लील अंगाने अर्थ जोडला गेल्याने, चांगल्या गोष्टी दबल्या आहेत, असं ई साहित्य प्रतिष्ठानने म्हटलं आहे.
८०० वर्ष जुने संदर्भ...
हे काव्य ८०० वर्षापूर्वीचं आहे, सामाजिक संदर्भ हे तेवढेच जुने आहेत, घर कसे असावे, दैनंदिन जीवनात नेमक्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या कपड्यांची निवड करावी, यावर लिहिण्यात
अश्लील साहित्याचा आरोप होऊ नये म्हणून...
कामसूत्र या विषयाला अश्लील शब्द जोडला गेल्याने, अश्लील साहित्य प्रसारित करण्याचा आरोप ई साहित्य प्रतिष्ठानवर होऊ नये, म्हणून सोशल मीडियावर ऑनलाईन सर्वेक्षण करून नेटीझन्सकडून कौल घेण्यात आला.
गैरसमज दूर व्हावेत म्हणून....
अर्ध्या तासात हजारो नेटीझन्सने म्हटलंय, काही वाचकांचे गैरसमज दूर व्हावेत म्हणून ते प्रकाशित करावे. अखेर कामसूत्रचे शनिवारी प्रकाशन करण्यात आले.
कामसूत्र पुस्तकाची पीडीएफ लिंक -- हे प्रकाशन ई साहित्य प्रतिष्ठानचे आहे,
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.