मुंबई: सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे.
1. मासिक पाळी दर 28 दिवसांनीच यायला हवी
वस्तुस्थिती: पाळीचं चक्र हे प्रत्येक महिलेच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. 20 दिवसांपासून 35 दिवसांदरम्यान कधीही मासिक पाळी येऊ शकते. पिरेड्स येण्यात काही दिवस उशीर झाला तर असं नाही की तुम्ही गर्भवती आहात. जर पाळी येण्यास थोडाच उशीर झाला असेल तर घाबरण्याची गरज नाही.
2. मासिक पाळीदरम्यान सेक्स करू नये
वस्तुस्थिती: अधिक जण पाळीदरम्यान आपल्या पार्टनरसोबत सेक्स करणं पसंत करत नाही. मात्र पाळी असतांना सेक्स केल्यानं आपल्याला आडकाठी / उबळपासून आराम मिळतो. संशोधकांच्या मते पाळीदरम्यान सेक्स केल्यानं वेदना कमी होतात.
3. मासिक पाळीमध्ये गर्भवती राहू शकत नाही
वस्तुस्थिती: हा समज चुकीचा आहे. आपण मासिक पाळीदरम्यान गर्भवती राहू शकता. ज्या महिलांचं मासिक चक्र 28 दिवसांहून कमीचं असतं, त्यांच्यात पाळीदरम्यान गर्भवती होण्याची शक्यता अधिक असते.
4. मासिक पाळीदरम्यान आंबट, तेल-मसालेयुक्त जेवण करू नये
वस्तुस्थिती: पाळीमध्ये उबळ आल्यास त्यांचा संबंध आंबट खाद्यपदार्थांसोबत अजिबात नाही. मसालेदार जेवणानं पोट खराब होऊ शकतं. पण त्याचा पाळीतील वेदनांवर काही परिणाम होत नाही.
5. मासिक पाळीदरम्यान व्यायाम करू नये
वस्तुस्थिती: पाळीदरम्यान व्यायाम त्रासाला कमी करतो. कारण व्यायाम स्नायूंमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुधारतो, ज्यामुळं शरीराला आराम मिळतो.
6. पाळीमध्ये आराम करायला हवा
वस्तुस्थिती: मासिक पाळीमध्ये शरीरातून रक्तस्त्राव होतो ज्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. एका दिवसात जवळपास चार चमचे रक्तस्त्राव होत असतो. महिला आपलं दैनिक काम आरामात करू शकतात.
7. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम
वस्तुस्थिती: महिला यावेळी पीएमएस प्रक्रियेतून जात असतात. कारण जवळपास 85 टक्के महिला याप्रकारच्या लक्षणांचा अनुभव घेतात.
8. पाळीतील रक्त सामान्य रक्तापेक्षा वेगळं असतं
वस्तुस्थिती: मासिक पाळीतील रक्त हे इतर रक्तासारखं सामान्यच असतं. या काहीच असामान्य नसतं.
9. मासिक पाळीच्या वेळी केस धुवू नये
वस्तुस्थिती: हा गैरसमज फार पूर्वीपासून पसरला आहे. आंघोळ केल्यानं, केस धुतल्यानं रक्तस्त्राव कमजोर होतो, असा समज आहे. मात्र असं काहीच नाहीय. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आंघोळ करू शकता.
10. कुमारीकांना कॉटनचा वापर करू नये
वस्तुस्थिती: अनेक लोकांना वाटतं की, कुमारीकांनी कॉटनचा वापर करू नये. त्यांनी कॉटनचा वार केला तर त्यांचं कौमार्य नष्ट होतं. पण याचा काहीही संबंध नाही, असं वैज्ञानिक सांगतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.