दुखण्यावर गोळी घेण्याआधी या ७ गोष्टी वाचाच

डोकं दुखतंय, हात दुखतोय किंवा आणखी इतर स्नायू दुखत असतील तर आपण मेडिकलमध्ये जातो आणि लगेचच पेनकिलर गोळी घेऊन येतो आणि ती डॉक्टरांच्या कोणत्याही सल्ला न घेताच खातो. पण असं करणं धोकादायक असू शकतं. पेनकिलर घेण्याआधी या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Updated: Dec 15, 2015, 06:51 PM IST
दुखण्यावर गोळी घेण्याआधी या ७ गोष्टी वाचाच title=

मुंबई : डोकं दुखतंय, हात दुखतोय किंवा आणखी इतर स्नायू दुखत असतील तर आपण मेडिकलमध्ये जातो आणि लगेचच पेनकिलर गोळी घेऊन येतो आणि ती डॉक्टरांच्या कोणत्याही सल्ला न घेताच खातो. पण असं करणं धोकादायक असू शकतं.

पेनकिलर घेण्याआधी या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

१) रिकाम्या पोटी कोणतीही गोळी घेऊ नये.
२) गोळी घेतांना भरपूर पाणी प्या.
३) एकापेक्षा अधिक पेनकिलर घेऊ नका.
४) पेनकिलरच्या गोळ्यांची सवय लावू नका.
५) २ दिवसांपेक्षा जास्त काळ दुखणे सुरू असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
६) तुम्ही घेत असलेल्या गोळ्यांच्या दुष्परिणामाविषयी डॉक्टरांकडून माहिती घ्या.
७) दारू आणि पेनकिलर गोळी एकत्र घेणे धोकादायक ठरू शकतं.

विशेष काळजी घ्या :
उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे आजार असलेल्यांनी कोणतीही औषधे स्वतच्या मनाने घेऊ नयेत. या आजारांसाठी सुरू असलेल्या औषधांसोबत नेमक्या कोणत्या पेनकिलर योग्य ठरतील, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

पेनकिलर न घेता करा घरगुती उपाय :

जो स्नायू दुखतोय तेथे गरम पाण्याच्या पिशवीने शेक देता येईल. गरम पाण्यात पाय ठेवून बसल्यानेही बरे वाटते. सर्दीने डोके दुखत असेल, तर पाण्याची वाफ घ्यावी.
स्नायू आखडल्यासारखे वाटत असेल, तर स्ट्रेचेससारखे सोपे व्यायाम प्रकार करता येतील. रोज सकाळी उठल्यावर ५ ते १० मिनिटात हे व्यायाम प्रकार केल्यास फायदा होऊ शकतो.
उत्तम आहार हा तर प्रत्येक आजारावरील रामबाण उपाय. सर्दी, डोकेदुखीवर आल्याचा चहा आणि सुजलेल्या भागावर हळदीचा लेप हे उपाय अजूनही फायदेशीर ठरतात.

Tags: