या १२ गोष्टी तरूणी फक्त करतात आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत

  प्रत्येक तरूणीची एक घट्ट मैत्रीण असते आणि त्या आपल्या जीवलग मैत्रिणीसोबत काही गोष्टी करतात त्या कोणासोबतही करत नाही.

Updated: Jan 12, 2016, 10:11 PM IST
या १२ गोष्टी तरूणी फक्त करतात आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत title=

मुंबई :  प्रत्येक तरूणीची एक घट्ट मैत्रीण असते आणि त्या आपल्या जीवलग मैत्रिणीसोबत काही गोष्टी करतात त्या कोणासोबतही करत नाही.

मुलींच्या घट्ट मैत्रिणी या त्यांच्या सल्लागार असतात, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या असतात. आणि सर्वात महत्त्वाच्या त्या पार्ट टाइम आईची भूमिका बजावतात.

अशा काही गोष्टी आहेत ज्या तरूणी आपल्या मैत्रिणींसोबतच करतात. पाहू या त्या कोणत्या

१) आपल्या घट्ट मैत्रिणीसोबत रात्रभर पार्टी करतात. त्यावेळी त्यांना वेळेचे भान नसते.
२) आपल्या घट्ट मैत्रिणीसोबत आपले कपडे शेअर करतात. त्याचे कपडे घेऊ घालतात.
३) एकमेकांशी सर्व काही शेअर करतात आणि प्रामाणिक असतात.
४) एक गोष्ट अनेक वेळा त्याच त्याच मैत्रिणीसोबत खातात.
५) मैत्रिणीसोबत एक ड्रामा क्वीन प्रमाणे वागतात.
६) आपल्या मैत्रिणीसोबत शॉपिंगला जाणे, मैत्रिणच सांगू शकते काय तुम्हांला चांगले वाटते आणि काय वाईट.
७) एकमेकांच्या कल्पनेतील लग्नाचे प्लॅनिंग या घट्ट मैत्रिणी करतात.
८) एकमेकांच्या चुका शोधण्यासाठी घट्ट मैत्रिणी लागतात. घट्ट मैत्रिण तुमच्या तोंडावर तुमचे अवगुण सांगू शकते.
९) विचित्र पिकनिकवर मुली फक्त आपल्या मैत्रिणींसोबत जातात.
१०) कोणत्याही पूर्वग्रह न ठेवतात प्रत्येक गोष्ट शेअर करतात.  पहिला किस, आवडणारा तरूण, पहिली रात्र सुद्धा...
११) इतर महिलांच्या फॅशन सेन्सची टिंगल उडविणे.
१२) कंगना राणावतचा क्वीन पाहणे, कारण कोणाला क्वीनाचा बिनधास्त अंदाज आवडत नाही.