मुंबई : तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता सतावत असेल तर तुम्ही हे चार उपाय घरीच करा आणि पाहा तुमचे वजन झटपट व्यायाम न करता कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक कप जास्तीत जास्त गरम पाणी प्या. चहा प्रमाणे घोट घोट घ्या. त्यामुळे जाडी कमी करण्यासाठी गरम पाणी मदत करते. हा प्रयोग किमान दोन महिने करा. वजन कमी होण्याबरोबर गॅस, कप, कोलाइटिस ( आतील सूज), कृमी कमी होण्यास मदत होते.
दह्यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टीरिया असतात. ते जेवण पचविण्यासाठी मदत करतात. दररोज जेवण करताना दही खाणे चांगले. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
रोज सकाळी उठल्यानंतर एक चमचा हिरव्या कोथिंबीरची पेस्ट एक ग्लास गरम पाण्याबरोबर घ्या. यामुळे तीन दिवसात तुमच्या शरीरातील टाकावू केमिकल्स बाहेर पडतात. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
जेवणात नारळ तेलाचा वापर करा. नारळ तेलामुळे पर्यायी मात्रात फॅटी अॅसिड तयार होतात. ते शरीरातील जास्तीत जास्त कॅलरीज खर्च करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.