न्यूयॉर्क : महिला आपल्या मैत्रिणींना अनेक गोष्ट गिफ्ट म्हणून देतील पण, एक गोष्ट त्या कधीच इतर स्त्रियांना गिफ्ट करत नाहीत... किंवा आपली ती गोष्ट त्या इतर स्त्रियांशी कधीही शेअरही करत नाहीत... कोणती आहे ती गोष्ट...? विचारात पडलात ना?
परफ्यूम... होय... हीच ती गोष्ट जी एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत शेअर करत नाही... किंवा तिला गिफ्टही करत नाही... नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही गोष्ट समोर आलीय.
'फूड क्वालिटी अॅन्ड प्रिफरन्स' या मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, अनेक महिलांना आपला परफ्यूम व्यक्तीगत ठेवायचा असतो. कारण, त्या या सुगंधाला आपल्या व्यक्तीगत ओळखीचाच एक भाग मानत असतात. शिवाय अनेक महिला एकच परफ्युम वर्षानुवर्षे वापरतात.
या अभ्यासात समोर आलेल्या निष्कर्षाप्रमाणे जर एखाद्या महिलेनं जर एखादी महिला दुसऱ्या महिलेला परफ्यूम भेट म्हणून देत असेल तर नक्कीच तो परफ्यूम तिला पसंत नाही.
अभ्यासासाठी अमेरिका आणि नेदरलँडच्या 146 महिलांचा अभ्यास केला गेला. जर एखाद्या महिलेला एखादा परफ्युम आवडला तर त्या तो एकतर स्वत:साठी विकत घेतात किंवा आपल्या पुरुष मित्रासाठी... पण, आपल्या महिला मित्रांसाठी मात्र त्या कधीही परफ्युम विकत घेत नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.