बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या विचित्र सवयी

बॉलीवूड कलाकार त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल फार क्वचित बोलतात. ते त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय करत असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. याच बॉलीवूडमधल्या काही कलाकारांना अशा काही विचित्र सवयी आहेत ज्या वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

Aug 22, 2016, 19:41 PM IST

मुंबई : बॉलीवूड कलाकार त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल फार क्वचित बोलतात. ते त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय करत असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. याच बॉलीवूडमधल्या काही कलाकारांना अशा काही विचित्र सवयी आहेत ज्या वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

1/9

सैफ अली खान - सैफ अली खानला टॉयलेट सीटवर बसून वाचन कऱण्याची खूप आवड आहे. त्याच्या टॉयलेटमध्ये लायब्ररी तसेच फोनही आहे. 

2/9

सनी लिओन - बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन हिला सतत पाय धुण्याची सवय आहे. शूटिंगदरम्यान दर 15 मिनिटांनी ती तिचे पाय स्वच्छ करते. 

3/9

प्रिती झिंटा - बाथरुम स्वच्छ असण्याबाबत प्रिती नेहमी जागरुक असते. इतकंच नव्हे तर जेव्हा ती कोणतेही हॉटेल बुक करते तेव्हा तेथील बाथरुम ती सर्वात आधी चेक करते.

4/9

संजय दत्त - अभिनेता संजय दत्तने जरी सध्या ड्रिंक करणे कमी केले असले तरी गुटख्याचे व्यसन त्याचे काही जाता जात नाहीये. 

5/9

शाहीद कपूर - शाहीद कपूरला कॉफी इतकी आवडते की त्याचे जणू त्याला व्यसनच लागलेय. दिवसातून तो दहा कप कॉफी पितो. 

6/9

विद्या बालन - विद्या बालनला नेहमी तुम्ही साडीमध्येच पाहिले असेल. तिला इतकी साड्यांची आवड आहे की तिच्याकडे 800 साड्यांचे कलेक्शन आहे. 

7/9

शाहरुख खान - हल्ली जेथे तेथे सेल्फी काढण्याचे फॅड सुरु आहे. खातानाही अनेकजण सेल्फी काढतात. मात्र ही सवय शाहरुखला अजिबात आवडत नाही. तसेच त्याला आईस्क्रीमही अजिबात आवडत नाही.

8/9

सुष्मिता सेन - साप म्हटल्यावर कित्येकजण घाबरुन जातात. मात्र अभिनेत्री सुष्मिता सेन हिला चक्क साप खूप आवडतात. 

9/9

सलमान खान - बॉलीवूडमध्ये सलमानची ओळख दबंग खान अशी आहे. सलमानला विविध प्रकारचे साबण जमविण्याची खूप आवड आहे. त्याच्याकडे साबणाचे कलेक्शन आहे.