यावर्षी मशाल प्रज्वलनासोबतच विरार येथील भालीवली या आदीवासी पाड्यातील राष्ट्र सेवा समिती संचालित सरस्वती ज्ञानमंदीर शाळेतील मुलांना समितीच्या वतीने गडदर्शनही घडविण्यात आले.
2/9
रात्री ठिक बारा वाजता दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमानंतर संपूर्ण राजदरबार मशालींनी उजळला होता. त्यानंतर राजदरबार ते होळीचा माळ आणि तिथून शिरकाई देवीच्या मंदीरापर्यंत मशालींसोबत मिरवणूक काढण्यात आली.
3/9
याचसोबत किर्तन, पोवाडे आणि शिवचरित्र गीते अशा सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.
4/9
या समितीचे सदस्य रायगडावर मशाल पेटल्यानंतरच आपापल्या घरातील दिवाळी साजरा करणार आहेत
5/9
रायगडावरील सणांमधले हर्षोल्लोषाचे वातावरण पुन्हा निर्माण करणे या उद्देशातून समितीने या शिवचैतन्य सोहळ्याचे आयोजन केले होते.
6/9
दिवाळीसणात अवघा देश उजळून निघत असतांना स्वराज्याची राजधानी रायगड मात्र अंधारात असते या अस्वस्थ करणाऱ्या वस्तुस्थितीची जाणिव महाराष्ट्राला करून देणे, हा उद्देश होता.
7/9
श्री शिवराज्याभिषेक सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या उपक्रमाचे हे यंदाचे तीसरे वर्ष.
8/9
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३४१ वे वर्ष आहे. याचंच औचित्य साधून समितीच्या कार्यकर्त्यांनी रायगड ३४१ मशालींनी उजळवणीचा आपला मानस तडीस नेला
9/9
श्री शिवराज्याभिषेक सेवा समिती, दुर्गराज रायगडचे काही शिलेदार स्वराज्याची राजधानी रायगडावरील ऐन दिवाळीतील अंधार दूर केला.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link