मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनची फाशी कायम

मुंबई सीरियल ब्लॉस्ट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलीय. याकूबनं आपली फाशीची शिक्षा कमी करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टाच पुनर्विचार याचिका केली होती, ती कोर्टानं फेटाळलीय.  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज यापूर्वीच फेटाळून लावला आहे. 

Updated: Apr 9, 2015, 02:23 PM IST
मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनची फाशी कायम title=

नवी दिल्ली: मुंबई सीरियल ब्लॉस्ट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलीय. याकूबनं आपली फाशीची शिक्षा कमी करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टाच पुनर्विचार याचिका केली होती, ती कोर्टानं फेटाळलीय.  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज यापूर्वीच फेटाळून लावला आहे. 

गेल्यावर्षी कोर्टानं मेमनच्या फाशीला हंगामी स्थगिती दिली होती. त्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टानं त्यानं शिक्षेसंदर्भात दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली.  याकूब मेमन हा १९९३ सालच्या बॉम्बस्फोटांमागील सूत्रधार आणि फरार आरोपी टायमगर मेमन याचा भाऊ आहे. याकूबला टाडा कोर्टानं २००७ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. मार्च २०१३ साली झालेल्या सुनावणीमध्ये  सुप्रीम कोर्टानंही ‘टाडा‘ कोर्टाचा निर्णय कायम राखला होता. 

त्यानंतर ऑक्‍टोबर २०१३ मध्ये याकूब मेमननं राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळं त्यानं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती आणि आज कोर्टानं ती फेटाळून लावली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.