www.24taas.com, झी मीडिया, पंचकूला
हरियाणातील पंचकूला कोर्टाच्या निकालामुळे तीन गावांमधील तब्बल २५० गावकरी करोडपती बनले आहेत. या गावांमधील जमिनीवर रेसिंडेंशल सेक्टर बनवण्यात येणार आहेत. यासाठी सरकारतर्फे घोषित केलेल्या मोबदल्याच्या दुप्पट मोबदला कोर्टाने देण्याचा आदेश दिला आहे.
आता गावांतील जमिनींचा रेट प्रति एकर ६५ लाख रुपयेएवढा झाला आहे. सध्या या जमिनींवर कशा प्रकारे सेक्टर्स तयार होतील, याबद्दल कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. मात्र जेव्हा ही सेक्टर्स तयार होतीस, तेव्हा कोर्टाने निकाल दिलेल्या किमतीला हे प्लॉट विकले जाणार आहेत. जमिनींची किंमत इतर जमिनींपेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे.
या जमिनींवर अर्बन कॉम्प्लेक्स सेक्टर २, ३,४ आणि ५ बनवण्यात येणार आहेत. २०१० साली या जमिनींची किंमत गावांनुसार वेगवेगळी ठरवण्यात आली होती. यावर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याविरोधात कोर्टात गेल्यावर प्रत्येक गावाला समान किंमत मिळावी, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यामुळे तीन गावांतील शेतकरी करोडपती बनणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.