आधार कार्ड | टेंडरशिवाय दिलं १३ हजार कोटींचं काम

काँग्रेसच्या नेतृत्वात काम करणाऱ्या मागील यूपीए सरकारने आधार कार्ड योजना आणली, पण ही १३ हजार ६६३ कोटीची योजना कोणतंही टेंडर न देता राबवण्यात आली.

Updated: Sep 20, 2015, 06:51 PM IST
आधार कार्ड | टेंडरशिवाय दिलं १३ हजार कोटींचं काम title=

मुंबई : काँग्रेसच्या नेतृत्वात काम करणाऱ्या मागील यूपीए सरकारने आधार कार्ड योजना आणली, पण ही १३ हजार ६६३ कोटीची योजना कोणतंही टेंडर न देता राबवण्यात आली.

देशभरातील ९० कोटी ३० लाख लोकांना आधारकार्डचं वाटप करण्यात आलं आहे, यातील ६ हजार ५६२ कोटी रूपये कंत्राटदार कंपन्यांना पाठवण्यात आले आहेत.

आयटी एक्सपर्ट नंदन निलकेणी यांना ही जबाबदारी देण्यात आली होती असं सांगण्यात येत आहे. मात्र कोणतंही टेंडर न काढता काही ठराविक कंपन्यांना काम देण्यात आलं. मात्र ज्या कंपन्यांना टेंडर देण्यात आलं, त्या नामांकित कंपन्या आहेत.

टाटा कन्सल्टसी, नॅशनल इन्फॉर्मेटिक सेन्टर, एचपी, महिंद्रा सत्यम सारख्या बड्या कंपन्यांना ही कामं देण्यात आली आहेत. आरटीआय एक्सपर्ट अनिल गलगली यांनी ही माहिती मागवली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.