धक्कादायक: रोहतकमध्ये निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणासारखीच अंगावर शहारे आणणारी घटना रोहतकमध्ये घडली आहे. अज्ञात नराधमांनी २८ वर्षाच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीची बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना रोहतकमध्ये घडलीय. एवढंच नव्हे तर  बलात्कारानंतर नराधमांनी पिडीत तरुणीच्या गुप्तांगामध्ये छोटी खडी टाकून ठेवल्याचं समोर आलं आहे. या संतापजनक घटनेची दखल महिला आयोगानं घेतली असून महिला आयोगानं रोहतक पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. 

PTI | Updated: Feb 8, 2015, 06:03 PM IST
धक्कादायक: रोहतकमध्ये निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती title=

रोहतक,हरियाणा: दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणासारखीच अंगावर शहारे आणणारी घटना रोहतकमध्ये घडली आहे. अज्ञात नराधमांनी २८ वर्षाच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीची बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना रोहतकमध्ये घडलीय. एवढंच नव्हे तर  बलात्कारानंतर नराधमांनी पिडीत तरुणीच्या गुप्तांगामध्ये छोटी खडी टाकून ठेवल्याचं समोर आलं आहे. या संतापजनक घटनेची दखल महिला आयोगानं घेतली असून महिला आयोगानं रोहतक पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. 

नेपाळमध्ये राहणारी २८ वर्षीय तरुणी हरियाणातील रोहतकमध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. तिला मानसिक आजार असून यासाठी तिच्यावर उपचारही सुरु होते. संबंधीत तरुणी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तीन दिवसांपूर्वी तिचा मृतदेह रोहतकमधील ग्रामीण भागातील निर्जन ठिकाणी आढळला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पंडित भगवत दयाल शर्मा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथं पाठवला. या शवविच्छेदनातून अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

नराधमांनी पिडीत तरुणीवर बलात्कार केला आणि यानंतर तिची हत्या केली. हत्येपूर्वी नराधमांनी तिच्या गुप्तांगात काठी, छोटी खडी टाकण्याचं अत्यंत निर्घृण कृत्यही केलं. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं त्याचं शवविच्छेदन करणं कठीण होतं,  माझ्या आजवरच्या कारकिर्दीत ऐवढं अघोरी कृत्य मी कधीच बघितलं नव्हतं, असं डॉ. एस. के. धत्तेरवाल यांनी सांगितलं. धत्तेरवाल यांनी आत्तापर्यंत सुमारे ३० हजार ऑटोप्सी केल्या आहेत. 

हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर पोलिसांनी अज्ञात नराधमांविरोधात बलात्कार, हत्या, अनैसर्गिक संभोग अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. नराधमांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकं तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणातही नराधमांनी असं क्रूरकृत्य केलं होतं. रोहतकमधील घटनेनं निर्भया प्रकरणाची जखम ताजी केली आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.