एअर इंडियाच्या प्रवाशांना मिळणार विशेष सूट

विमान कंपनी एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. एअर इंडियाने अमेरिकेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कंपनी विशेष सूट देणार आहे. स्टार अॅवार्ड माइलेज रिडंप्शन' नावाने ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

Intern Intern | Updated: Apr 16, 2017, 10:34 AM IST
एअर इंडियाच्या प्रवाशांना मिळणार विशेष सूट title=

मुंबई : विमान कंपनी एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. एअर इंडियाने अमेरिकेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कंपनी विशेष सूट देणार आहे. स्टार अॅवार्ड माइलेज रिडंप्शन' नावाने ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

ही ऑफर सहा दिवसांठी आहे. गुरूवार पासून सुरू करण्यात आलेली ही ऑफर १८ एप्रिलपर्यंत असणार आहे. ही ऑफर स्विकारणारे प्रवाशी पुढील ३३० दिवसात केव्हाही प्रवास करू शकतात. या ऑफरनुसार एअर इंडियाच्या प्रवाशांना २,५०० किलो मीटरच्या प्रवासात सवलत दिली जाणार आहे.