लखनऊ : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि त्यांचा मुलगा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातली दरी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. अखिलेश आणि मुलायम यांच्यात समेट घडवून आणण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचं आता स्पष्ट झाले आहे
शनिवारी संध्याकाळी अखिलेश गटाचे प्रतिनिधी रामगोपाल यादव यांनी निवडणूक आयोगासमोर उत्तर प्रदेशातल्या 74 जिल्ह्यातून अखिलेश यादव यांना पाठिंबा देण्यासाठी मागवण्यात आलेली प्रतिज्ञापत्र सादर केली. सुमारे दीड लाख कागदपत्र रामगोपाल यादवांनी निवडणूक आयोगासमोर सादर केली आहे.
शिवाय सायकल या समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हावरही दावा आणखी मजबूत केला. तिकडे मुलायमसिंह यादव आणि त्यांचे बंधू शिवपाल यादवांशी चर्चा केली.येत्या 9 तारखेपर्यंत निवडणूक आयोगानं दोन्ही पक्षांना चिन्हाच्या मुद्द्यावर बाजू मांडण्यास मुदत दिली आहे. त्यामुळे आता यापुढे मुलायम सिंह काय रणनीती आखतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.