अमेरिकेत विकली जातेय गांधीजींच्या नावानं बिअर!

जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचं छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीनं त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आलं आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैदराबादमधील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यानंतर कंपनीनं माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

Updated: Jan 4, 2015, 04:49 PM IST
अमेरिकेत विकली जातेय गांधीजींच्या नावानं बिअर! title=

हैदराबाद: जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचं छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीनं त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आलं आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैदराबादमधील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यानंतर कंपनीनं माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

अमेरिका स्थित न्यू इंग्लंड ब्रूईंग कंपनी या कंपनीनं राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नावे अमेरिकेतील बाजारपेठेमध्ये 'गांधी बोट' ही बिअर आणली आहे. गांधींजींप्रमाणे ही बिअरही शाकाहारी असून आत्म शुद्धिकरण आणि सत्याच्या शोधात असलेल्यांसाठी ही बिअर उपयुक्त आहे, अशी जाहिरातबाजीही या कंपनीनं सुरु केली होती. हा प्रकार समजताच त्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले.हैदराबादमधील एका वकिलानं कोर्टामध्ये कंपनीविरोधात याचिका दाखल केली होती. 

महात्मा गांधीजींचं छायाचित्रांचा अशा कामासाठी वापर करणं दंडनीय अपराध असून यामुळं राष्ट्रभावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्ते वकिल जनार्दन रेड्डी यांनी केला होता. याप्रकरणी उद्या सुनावणीही होणार आहे. भारतात तीव्र पडसाद उमटताच कंपनीला जाग आली असून कंपनीनं या कृत्यांसाठी भारतीयांची माफीही मागितली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.