चंदीगढ: आर्मीचे माजी कमांडर ले. जनरल पीएन हून यांनी लिहिलेल्या पुस्तकात,'द अंटोल्ड ट्रूथ'मध्ये त्यांनी दावा केलाय की, १९८७मध्ये सैन्यानं राजीव गांधी सरकार उलथण्याचा कट रचला होता.
१९८७ मध्ये सैन्याच्या तीन तुकड्यांना दिल्लीच्या दिशेनं कूच करण्याचे आदेश दिले गेले होते असा दावा हून यांनी केला आहे. तत्कालीन लष्कर प्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी, लेफ्ट. जनरल एस.एफ. रॉड्रीग्ज हे अधिकारी देखील या कटात सहभागी असल्याचा आरोप हून यांनी केला आहे.
हून यांच्या पुस्तकात त्यांनी सांगितलंय की, राजीव गांधींच्या कार्यशैलीवर नाराज असणाऱ्या त्या काळच्या काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी या कटाची आखणी केली होती. पण वेळेतच या कटाची माहिती राजीव गांधींनी समजल्यानं मोठा अनर्थ टळला, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, स्पेशल फोर्सेजचे फाऊंडर्समधील एक सीनिअर वेस्टर्न कर्नल के एस पाठक यांनी हून यांच्या पुस्तकातील दावे खोटे असल्याचं म्हटलंय. त्यावेळी दिल्लीत शिख दंगल भडकल्यानं परिस्थिती खराब होती म्हणून दिल्लीत सैन्याला बोलावलं असल्याचं ते म्हणाले. हनू ऑक्टोबर १९८७मध्ये निवृत्त झाले होते. राजीव गांधी यांच्या कॅबिनेटमधील मंत्री व्ही.सी.शुक्ला यांनाही सैन्याच्या या अॅक्शनबद्दल माहिती होती. त्यामुळं हे हून यांची 'स्वत:ची धारणा' असल्याचं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.