नवी दिल्ली : बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेला आज 23 वर्ष पूर्ण झाले. त्यावरूनच आता राजकीय वक्तव्य आता नेत्यांकडून येण्यास सुरुवात झाली आहे.
असदुद्दीन ओवैसी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
'जेव्हा बाबरी मस्जिद पडली त्यावेळेस केंद्रात नरसिम्हा राव यांचं सरकार होतं. त्यामुळे या घटनेला पूर्णपणे त्यावेळेसचं केंद्र सरकार जबाबदार असल्याचं' वक्तव्य साक्षी महाराजांनी केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.