श्रीनगर: जम्मू-श्रीनगर हायवेवर उधमपूर जिल्ह्यात सामरोली इथं BSFच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत, तर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलंय. सीमा सुरक्षा दलाचे 8
जवान जखमी झाल्याची माहिती पीटीआयनं दिलीये.
BSFचं हे पथक हायवेवर गस्त घातल होतं. त्याच वेळी अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र तोपर्यंत दोन जवान शहीद झाले होते. पोलीस आणि CRPFनं घटनास्थळी धाव घेतली असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून अतिरेक्यांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. हायवेवरील वाहतूकही बंद करण्यात आलीये.
दरम्यान, एकीकडे दहशतवाद्यांचा हल्ला ताजा असतानाच दुसरीकडे सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केलंय.
काश्मीरच्या पुँछ भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या खोड्या सुरूच आहेत. काल रात्री 3च्या सुमारास पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय तळाच्या दिशेनं उखळी तोफांचा मारा केला. यात एक महिला जखमी झालीये. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नसिमा असं या महिलेचं नाव असल्याचं समजतंय. एकट्या ऑगस्टमध्ये पाकिस्ताननं केलेलं हे 11वं शस्त्रसंधी उल्लंघन आहे... यात आतापर्यंत 1 तरुण ठार तर एका BSF जवानासह 2 जण जखमी झालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.