www.24taas.com, वृत्तसंस्था, जम्मू
पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) आरएस पुरा सेक्टरमधील भारतीय सैन्यांच्या चौकीवर पुन्हा गोळीबार केलाय. या गोळाबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला असून सहा जवान जखमी झाले आहेत. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.
पाकिस्ताहनकडून रात्री आरएसपुरा सेक्टेर आणि परगावल सेक्ट्र मध्ये जोरदार गोळाबार केला. हा गोळाबार जबळपास सहा तास सुरू होता. पाकच्या सैन्याकडून आजुबाजुच्या गावांवर रॉकेट हल्ला करण्यात आल्याचे माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आरएस पुरा सेक्टरमधील पारगावाल भागातील सुमारे १५ भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याकडून मंगळवारी रात्रभर गोळीबार सुरू होता.
भारतीय जवानांनाही पाकच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. पण, पाकच्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. त्यापूर्वी पाकिस्तानी सैन्याने पूँछ जिल्ह्यात भारताच्या अनेक चौक्यां ना लक्ष्य करीत गोळीबार केला होता. पाक सैन्याने तोफगोळे डागून बेछूट गोळीबार केला होता.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी सीमाभागाची हवाई पाहाणी केली. शिंदे यांनी भेट देत सुरक्षेचा आढावा घेतला होता. पण, या भेटीनंतर काही तासांतच पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करण्यात आला आहे. पाक सैन्याकडून यावर्षभरात जवळपास २०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.