www.24taas.com,वृत्तसंस्था,नवी दिल्ली
राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी ए.के.एन्टोनींची भेट घेतलीय. तर महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहतायत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेते आणि मंत्री दिल्लीत पोहचलेत.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी काल रात्री उशीरा त्यांनी सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पटेल यांच्याशी 40 मिनिटे चर्चा केली. आज ते काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना भेटणार असल्याचं समजतंय. दरम्यान काँग्रेस नेते ए.के. एंटोनी आणि गुलाब नबी आझाद सोमवारी मुंबईत येण्याची शक्यता असून काँग्रेस विधीमंडळाची बैठक सोमवारी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहतायत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेते आणि मंत्री दिल्लीत पोहचलेत. शिवाजीराव मोघे हे काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तर नारायण राणे, हर्षवर्धन पाटील आणि शिवाजीराव देशमुख हेसुद्धा दिल्लीत दाखल झालेत. शिवाय सीएम गटातील शिवाजीराव देशमुख, आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, सुरेश जेठलिया, शिरीष कोटवाल, शिरीष चौधरी यांसह दीपक आतराम, राजन भोसले या नेत्यांनीही दिल्ली गाठली आहे.
महाराष्ट्राव्यतिरिक्त आसाम आणि हरयाणामध्येही मुख्यमंत्री बदल अपेक्षित आहे.. हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांनी सोनिया गांधींची भेट घेतली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.