चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच

चीनने तिबेटला रोड आणि रेल्वेच्या माध्यामातून नेपाळशी जोडल्यानंतर आता चीन आपले जाळे बिहारपर्यंत पसरविण्याचा विचार करत आहे.

Updated: May 25, 2016, 04:23 PM IST
चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच title=

चीन : चीनने तिबेटला रोड आणि रेल्वेच्या माध्यामातून नेपाळशी जोडल्यानंतर आता चीन आपले जाळे बिहारपर्यंत पसरविण्याचा विचार करत आहे.

कसा करतोय चीन आपला विस्तार

नेपाळमधल्या रसूवागधी या सीमावर्ती भागाला रेल्वेनं जोडण्याचा करार चीन आणि नेपाळमध्ये आधीच झाला आहे. २०२० पर्यंत नेपाळच्या सीमेपर्यंत चीन रेल्वेमार्ग बांधणार अशी माहिती ग्लोबल टाइम्सने दिली आहे. नेपाळच्या रसूगावधी या सीमेच्या माध्यमातूनच चीन भारतातही रेल्वेचे जाळे पसरविणार आहे.

रसूगावधी ते बिरगुंजपर्यंत हा रेल्वेमार्ग असेल. बिरगुंजपासून बिहार केवळ २४० किलोमीटरवर आहे. या मार्गातूनच चीनला कोलकाताला कमी वेळेत पोहोचणे जास्त सोयीस्कर पडेल.

चीनने नेपाळला आधीच स्वतःच्या अधिपत्याखाली आणले आहे. आता चीनचा भारत आणि दक्षिण आशियापर्यंत रेल्वेच्या माध्यमातून आपले जाळे पसरविण्याचा विचार असल्याची माहिती चीनच्या मीडियाने दिली आहे