नवी दिल्ली : सोशल मीडियावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा एक वादग्रस्त फोटो व्हायरल झाला. व्हाट्सअॅप या मेसेजिंग अॅपवर आपत्तीजनक फोटो टाकला गेला होता. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये दोन गटांत हाणामारी झाली. यात ३३ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मारहाण करणारे ६ लोक जखमी झालेत.
दोन गटांत झालेल्या हाणामारीत उमेश वर्मा नावाची व्यक्ती जखमी झाली. उमेशला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काँग्रेस कार्यकर्ताने संपर्कासाठी एक व्हाट्सअॅपवर गावातील लोकांचा ग्रुप केला होता. या ग्रुपवर प्रशांत नायक नावाच्या व्यक्तीने सोनिया गांधी यांचा हा फोटो पोस्ट केल्याचा आरोप आहे. सोनिया गांधी यांना भांडी घासता या फोटोत दाखविण्यात आलेय. त्यासोबत एक ओळ आहे. नरेंद्र मोदींमुळे सोनियांवर ही वेळ आलेय.
या फोटोनंतर दोन गट एकमेकांना भिडलेत. दोन गटांत राडा झाला. त्यानंतर पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी बाचाबाची झाली. काँग्रेस पार्षदच्या समूहाच्यानुसार विरोधकांनी खुलेआम विजय नगर पोलीस ठाण्यात चाकू काढला. दरम्यान, पोलिसांना हा आरोप फेटाळून लावलाय. तर ही हाणामारी रोखण्यासाठी पोलिसांनी दुसऱ्या पोलीस स्टेशनची मदत घेतली आणि पोलीस कुमक मागविली. काँग्रेस कार्य़कर्त्या पार्षदने सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केलेय.