नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि कोसळ खाण कामगारांची बोलणी फिस्कटल्याने कामगारांची पुकारलेला संप सुरुच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केलेय. तसं पीटीआयने वृत्त दिलं आहे. दरम्यान, या संपामुळे १५०० कोटी रुपयांचे दररोजचे नुकसान होत आहे.
केंद्राच्या कोळसा खासगीकरण धोरणाविरोधात कामगारांचा देशव्यापी संप सुरू आहे. चंद्रपूरसह राज्यातल्या ५० कोळसा खाणींचं काम बंद आहे. त्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोळसा खाणींच्या खाजगीकरणाविरोधात देशातल्या ५ मुख्य कामगार संघटनांनी एकत्र येत पुकारलेल्या देशव्यापी संपाला आजपासून सुरूवात झाली आहे. कोळसा कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या कोल इंडियाच्या अंतर्गत येणाऱ्या पाचही कामगार संघटनांनी एकत्र येत संप पुकारला आहे. हे काम बंद आंदोलन ५ दिवस चालणार आहे.
कोळसा कामगारांच्या संपाचा सर्वाधिक परिणाम चंद्रपूर जिल्ह्यातही दिसू लागला आहे. जिल्ह्यात असलेल्या सर्वच कोळसा खाणींच्या क्षेत्रात नारेबाजी आणि निदर्शने करत कामगारांनी काम बंद पाडलं. सलग ५ दिवस हा संप चालणार असल्यामुळे इतर उद्योगांना फटका बसण्याची शक्यता आहे. संपाचा फटका सर्वाधिक कोळशाची मागणी असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राला बसण्याची शक्यता असून वीज निर्मिती धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.