गटारात सापडल्या पाचशे-हजारच्या नोटा

गुवाहाटीच्या रुक्मिणीनगर भागामध्ये गटारात टाकलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या ढिगभर नोटा आढळून आल्या आहेत.

Updated: Nov 14, 2016, 12:28 PM IST
गटारात सापडल्या पाचशे-हजारच्या नोटा

गुवाहाटी : गुवाहाटीच्या रुक्मिणीनगर भागामध्ये गटारात टाकलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या ढिगभर नोटा आढळून आल्या आहेत. या नोटा कोणाच्या आहेत आणि त्या गटारात कोणी फेकल्या याचा अधिक तपास सुरु आहे.

भ्रष्टाचारी दहशतवादी आणि काळे पैसे बाळगणाऱ्यांना दणका देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बदलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशाप्रकारे नोटा आढळून आल्या. पुण्यामध्ये कचरापेटीमध्ये तर काही ठिकाणी पोत्यामध्ये भरलेल्या नोटा सापडल्या. गंगा नदीमध्येही मोठ्याप्रमाणावर पाचशे आणि हजाराच्या नोटा फेकून देण्यात आल्या.