तिरुपती : तिरुपती भक्तांसाठी एक गुडन्यूज आहे. तिरुपती देवस्थानाने प्रायोगिक तत्वावर बुधवारपासून ऑनलाईन तिकिट विक्री सुरू केली आहे.
तिरुमाला तिरुपती देवस्थानने स्पेशल दर्शन तिकीटासाठी 300 रुपये आकारले आहे. तसेच एकूण 5000 तिकिट ऑनलाइन विकली जाणार आहेत. देवस्थानाने इंटरनेटच्या माध्यमातून ई-दर्शन ही सुविधा उपलब्ध केली असून या ठिकाणी ऑनलाइन तिकिट बुकिंग केली जाणार आहेत.
तर 2500 तिकिटे ई-दर्शन काऊंटवर उपलब्ध केली जाणार आहेत. तसेच बाकी तिकिट ई - दर्शन इंटरनेटच्या माध्यमातून मिळणार आहेत. भाविकांना दर्शनासाठी लागणा-या वेळेची बचत व्हावी, असा या योजनेचा मुख्य हेतू असल्याचे देवस्थानने स्पष्ट केले आहे. आजपासून तिकिट खरेदी केली आहेत त्यांना 27 ऑगस्टपासून दुपारी दोन वाजल्यानंतर दोन तासांच्या वेळात दर्शन मिळेल, असे देवस्थानने स्पष्ट केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.